इंदूर : ‘झेड ब्लॅक’ या भारतातील आघाडीच्या ब्रँडच्या थ्री इन वन प्रीमिअम अगरबत्तीच्या नव्या जाहिरातीत दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रेमळ पित्याच्या भूमिकेत दिसून आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून एमएस धोनी झेड ब्लॅकचा ब्रँड अँबेसेडर आहे. मनी की शांती, हे केवळ एक टीव्हीसी कॅम्पेन नाही, तर मानसिक आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी रोजच्या जीवनात प्रार्थनेचे किती महत्त्व आहे, हे मनापासून दर्शविण्याचा हा प्रयत्न आहे. धोनी त्याच्या असामान्य नेतृत्वासाठी आणि न डगमगणाऱ्या वृत्तीसाठी ओळखला जातो. त्याचे हे व्यक्तिमत्त्व या कॅम्पेनच्या संदेशात दिसून येते, असे म्हैसूर दीप परफ्युमरी हाऊस अँड झेड ब्लॅकचे संचालक अंकित अग्रवाल म्हणाले, तर धोनीसोबत पुन्हा एकदा सहयोग करणे ही आमच्यासाठी बहुमानाची बाब आहे, असे म्हैसूर दीप परफ्युमरी हाउस व झेड ब्लॅकचे संचालक अंशुल अग्रवाल म्हणाले. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये ‘झेड ब्लॅक’चा जगातील सर्वांत मोठा सौरऊर्जेवर चालणारा अगरबत्ती निर्मिती कारखाना आहे. या कंपनीतर्फे दर दिवशी ३.५ कोटी अगरबत्त्या बनविल्या जातात. (वा. प्र.)
‘झेड ब्लॅक’च्या जाहिरातीत धोनी प्रेमळ पित्याच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:03 IST