शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

डीएचएफएलमध्ये ठेवीदारांचे ६ हजार कोटी रुपये अडकले; चिंतेमुळे हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:14 IST

कर्ज आणि ठेवींची रक्कमच ८३ हजार ९00 कोटी रुपये

मुंबई : दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)ने बँका, विविध वित्तीय संस्था, तसेच सामान्य ठेवीदारांकडून घेतलेल्या कर्ज व ठेवींची रक्कम तब्बल ८३ हजार ९00 कोटी रुपये असून, हे पैसे परत कसे मिळणार, या चिंतेमुळे सारेच हतबल झाले आहेत.त्यापैकी बँकांकडून घेतलेले कर्ज ३१ टक्क्यांच्या आसपास असून, ती सारी रक्कम बँका बहुधा थकीत वा बुडीत कर्जे म्हणून दाखविण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने डीएचएफएलचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक केली आहे. आता त्याच्या मदतीसाठी तीन सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.तोपर्यंत पैसे मिळणे अशक्यच?डीएचएफएलवर दिवाळखोरीची कारवाई सुरू होणार असल्याने, या कंपनीने घेतलेली कर्जे व ठेवी यांची परतफेड सहजासहजी होणार नाही. कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यामुळेच लोकांना व बँका, तसेच वित्तीय संस्थांना त्यांच्या रकमा परत मिळणे अशक्यच आहे.या कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बँकांची कर्जे न फेडणाऱ्या कंपन्यांवर अशी कारवाई केली जाते. त्यामुळे ती सुरू होईल, पण या कंपनीत सामान्य ठेवीदारांचा हिस्सा केवळ ६ टक्के असला, तरी त्यांच्या ठेवींची रक्कम तब्बल ६ हजार कोटी रुपयांच्या आहेत.ही रक्कम परत कशी मिळणार, कधी मिळणार वा मिळणार का, असा प्रश्न आहे. त्यामुळे सारे सामान्य ठेवीदार हतबल झाले आहेत. डीएचएफएलबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी ज्यांनी त्या कंपनीला कर्जे दिली आहेत, त्यापैकी ६६ टक्के कर्जदारांची संमती गरजेची आहे. म्हणजेच बँका व वित्तीय संस्था यांनाच त्यात प्राधान्य मिळेल. सामान्य ठेवीदारांचा वाटा अवघा ६ टक्के असल्याने त्यांना कर्जदारांच्या समितीत जागा मिळेल का, ही शंका आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक