शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:08 IST

Dharamsheela Gupta : धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत.

बिहारमधील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  माजी आमदार भीमसिंह आणि धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. भीमसिंह हे नितीश सरकारमध्ये मंत्री राहिले होते, तर धर्मशीला गुप्ता या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.

धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत. राज्यसभेची उमेदवारी धर्मशीला गुप्ता यांना दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, धर्मशीला गुप्ता यांनी जिल्हा आणि बिहार राज्यातील संघटनेत अनेक पदे भूषवून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.  

धर्मशीला गुप्ता या डॉ. नागेंद्र झा महिला विद्यालयात शिक्षिका आहेत. कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2022 मध्ये दरभंगा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी धर्मशीला गुप्ता यांनी निवडणूक लढवली, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचा हळूहळू संघटनेत दबदबा निर्माण झाला. 

सुरुवातीला त्यांना दरभंगा जिल्हा भाजपा महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले. सध्या त्या कोल इंडियाच्या सदस्याही आहेत. धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले की, पक्षाने पुन्हा एकदा एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.  हे फक्त भाजपामध्येच शक्य आहे, पक्ष नेहमीच सामान्य कार्यकर्त्याचा आदर करतो, असे लोकांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे, धर्मशीला गुप्ता यांना राज्यसभेचे उमेदवार करून भाजपाने एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पक्षाच्या या दाव्याने संपूर्ण मिथिलाच्या महिला मतदारांना आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.  तसेच मिथिलांचलच्या सर्व वैश्य मतदारांना खूश केले आहे. याद्वारे भाजपाला आपल्या कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा आहे की, पक्ष सामान्य कार्यकर्त्यालाही राज्यसभेवर पाठवू शकतो. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBiharबिहार