शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी बहीण धावली पण मशीनमध्ये ओढणी अडकली अन्...; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 21:02 IST

एका रस्त्याचं काम सुरू होतं. त्यासाठी काही मशीन्स देखील होत्या. मजूर तेथे काम करत होते. याच दरम्यान एक लहान मुलगा रस्त्याचं काम सुरू असताना नेमका खेळत-खेळत मोठ्या मशीनजवळ गेला होता.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान मन सुन्न करणारी घटना घडली आहे. भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर (Bilaspur) गावात ही दुर्घटना घडली. धर्मशाळा जिल्ह्यातील हरिपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा परिसर येतो. 

एका रस्त्याचं काम सुरू होतं. त्यासाठी काही मशीन्स देखील होत्या. मजूर तेथे काम करत होते. याच दरम्यान एक लहान मुलगा रस्त्याचं काम सुरू असताना नेमका खेळत-खेळत मोठ्या मशीनजवळ गेला होता. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. हा मुलगा मशीनजवळ पोहचल्याचे पाहून त्याची 19 वर्षीय बहीण धावत पळत त्याच्याजवळ पोहोचली. तोपर्यंत हा मुलगा मशीनच्या बराच जवळ पोचला होता. तिनं आपल्या भावाला मागे ओढलं आणि वाचवलं. मात्र भावाचा जीव वाचवताना बहिणीची ओढणी मशिनमध्ये अडकली आणि तिला ओढले जाऊ लागले. 

मुलगी मशीनमध्ये ओढली जाऊ लागली. तिचे केसही मशीनमध्ये अडकले. तिने जोरजोरात आरडाओरडा केला, मात्र काही क्षणात ती मशीनमध्ये ओढली गेली. आरडाओरड ऐकून धावत आलेल्या काहींनी मशीन बंद केली आणि तिला बाहेर काढून उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितले. याची माहिती नगरोटा सूरिया पोलीस चौकीला देण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रभारी सुशील कुमार यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत सर्व माहिती घेऊन मृत्यूची नोंद केली आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! मास्क लावला नसल्याने पोलिसांनी मुलाच्या हातापायात ठोकला खिळा; महिलेचा गंभीर आरोप

मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाने मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी मुलाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरातली ही घटना आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मास्क लावला नाही म्हणून तीन पोलीस आले आणि आपल्या मुलाला घेऊन गेले. अनेक तास शोधल्यानंतर हा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते. बरेलीमधल्या बरादरी भागातली ही घटना आहे. महिलेने आणि तिच्या कुटुंबाने याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या मुलाला अटक करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशDeathमृत्यू