शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:12 IST

तटकरे राष्ट्रीय कार्यकारिणीत : रविवारी होणार घोषणा

अतुल कुलकर्णी ।मुंबई : राष्टÑवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्टÑीय कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. २९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी २९ एप्रिल रोजी औपचारिक निवडणूक होत आहे. तटकरे हे चार वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष असून आपल्याला या पदातून मुक्त करा, अशी मागणी स्वत:हून त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी वित्तमंत्री आ. जयंत पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नावे चर्चेत असली तरी, तरुण ओबीसी चेहरा, फर्डे वक्तृत्व, धडाडी आणि संघटनकौशल्य या गुणांमुळे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षनेतृत्वाकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. हल्लाबोल यात्रा आणि विधान परिषदेत मुंडे यांनी मंत्र्यांवर शेलके वार करून सरकारची कोंडी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत तरुण नेतृत्वाला वाव मिळण्याची शक्यता आहे.सत्ताधाºयांनी साम-दाम-दंड-भेद वापरून पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या परिस्थितीतही पक्ष मजबूत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला. सलग ४ वर्षे हे पद सांभाळले असल्यामुळे माझा विचार न करता इतर सक्षम नेत्याचा विचार करावा, अशी मागणी आपणच पक्षाकडे केली आहे.- सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस)

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस