शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:16 IST

सध्या स्थानिक प्रशासनाने दररोज ३०-४० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामलला दर्शनासाठी भारतासह जगभरातून भाविकांची गर्दी होणार आहे. सध्या अयोध्येत दररोज येणाऱ्या भाविकांची सरासरी संख्या ३५ हजार असल्याचे सांगण्यात येत असून, २२ जानेवारीनंतर ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाविकांच्या निवास, भोजन आदींची संपूर्ण व्यवस्था, तसेच शहर स्वच्छतेचे मोठे आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दर तिसऱ्या दिवशी व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाने दररोज ३०-४० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

आरती आणि दर्शनाची वेळ

जागरण/ श्रृंगार आरती : सकाळी ६:३० वाजताभोग आरती : दुपारी १२ संध्याकाळची आरती रात्री ७:३० वाजतादर्शन वेळ : सकाळी ७:०० ते ११:३० आणि दुपारी २:०० ते संध्याकाळी ७:००

असा काढा पास

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाईटला भेट द्या.ओटीपी प्राप्त करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.आरती किंवा दर्शनासाठी स्लॉट बुक करण्यासाठी ‘माय प्रोफाइल’ वर जा. आरतीची तारीख आणि वेळ निवडा.आवश्यक माहिती द्या.प्रवेश करण्यापूर्वी, मंदिराच्या आवारातील काउंटरवरून आपला पास घ्या.

कसे घेता येणार दर्शन?

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्य भाविकांना ऑनलाइन पास बुक करून दर्शनासाठी जाता येणार आहे. पास बुकिंगच्या दिवशी स्लॉटच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. श्रीराम जन्मभूमी येथील कार्यालयात भाविकांना आरतीच्या वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे लागेल. पास मिळवण्यासाठी तुमच्याकडे वैध सरकारी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या