शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Video: 'देवेंद्र फडणवीसांना आनंद, पण...'; ४ राज्यातील निकालावर थोडक्यात प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 1:52 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची सेमी फायनल ठरलेल्या या निवडणुकीत भाजपाने धुव्वादार बॅटींग करत आघाडी मिळवली आहे. तर, तीन राज्यात काँग्रेसची विकेट पडल्याचं चित्र आहे. तेलंगणात भाजपला एकहाती सत्ता मिळत नसली तर, भाजपाने १ जागेवरुन थेट ८ ते १० जागांपर्यंत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे, लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपने मुसंडी मारली असून काँग्रेसची कोंडी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे, भाजप नेते आणि कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. तर, राजस्थानमध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, काही वेळातच हे चित्र बदलले असून भाजपाने ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे, राजस्थानमध्येही पायलट व गेहलोत यांचे विमान हेलकावे खात असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार असून तिथे काँग्रेस सत्ता राखेल असा अंदाज होता. अनेक एक्झिट पोलमधूनही छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसून आले. मात्र, दुपारची आकडेवारी पाहिल्यानंतर येथेही भाजपाचे कमळ खुलल्याचं दिसून येत आहे. या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत एमपीच्या मनात मोदीच असल्याचं म्हटलं. 

४ राज्यातील निकालावर आता राज्यातील भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, नंतर मी यावर सविस्तर बोलेन, असेही त्यांनी म्हटले. ''मी आत्ता एवढंच सांगेन, मी आनंदी आहे, यावर मी सविस्तर बोलेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ४ राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच, विकास आणि विश्वास, देश केवल मोदीजी के साथ, अशीही प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली आहे.  दरम्यान, तेलंगणात बीआरएसला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेसची सरशी होत असल्याचं दिसून येतं. काँग्रेसने तेलंगणात ६० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून बीआरएस ३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन आहे. येथे काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला असून विजयी झाल्याच्या आनंदात लाडूवाटपही केले. 

दरम्यान, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम किंवा सेमीफायनल म्हणून ५ राज्यांतील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. त्यापैकी, ४ राज्यांमध्ये आज निकाल जाहीर होत आहे. मिझोरम वगळता निकाल हाती येत असलेल्या चारपैकी तीन राज्यात भाजपाने आघाडी घेतल्याने सेमीफायनलच्या सामन्यात भाजपाने धुव्वादार बॅटींग केल्याचं दिसून येत आहे. तर, सत्ताधारी छत्तीसगडमध्येही यंदा काँग्रेसची विकेट पडणार असल्याचं चित्र आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाMadhya Pradeshमध्य प्रदेश