शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’च्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे देवेंद्र दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:31 AM

देवेंद्र दर्डा यांनी यापूर्वी आयएनएस व इफ्रामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे.

नवी दिल्ली : ‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’च्या (एबीसी) अध्यक्षपदी ‘लोकमत माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची वर्ष २०२०-२०२१ साठी निवड करण्यात आली. भारतातील प्रादेशिक भाषांच्या माध्यमांत लोकमत माध्यम समूह अग्रणी असून, मुद्रित, डिजिटल, टीव्ही, इव्हेंटस्, अशा सर्वव्यापी माध्यम प्रकारांमध्ये आघाडीवर आहे.

देवेंद्र दर्डा यांनी यापूर्वी आयएनएस व इफ्रामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. त्याचबरोबर ते यवतमाळमधील विविध शिक्षण संस्थांचे अध्यक्षपद भूषवीत आहेत, तसेच ते वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये आहेत. एबीसीच्या उपाध्यक्षपदी आयटीसी लि.चे करुणेश बजाज यांची २०२०-२१ या वर्षासाठी निवड करण्यात आली.

एबीसीची २०२०-२१ ची व्यवस्थापन परिषद प्रकाशकांचे प्रतिनिधी

१) देवेंद्र दर्डा- लोकमत मीडिया प्रा.लि. (अध्यक्ष)२) रियाद मॅथ्यू- मल्याळम मनोरमा कं.लि. (मानद सचिव)३) होरमुसजी एन. कामा- द बॉम्बे समाचार प्रा.लि.४) शैलेश गुप्ता- जागरण प्रकाशन लि.५) प्रताप जी. पवार- सकाळ पेपर्स प्रा.लि.६) प्रवीण सोमेश्वर- एचटी मीडिया लि.७) मोहित जैन- बेनेट, कोलमन अँड कं. लि.८) धुरबा मुखर्जी- एबीपी प्रा.लि.

जाहिरातदारांचे प्रतिनिधी

१) करुणेश बजाज- आयटीसी लि. (उपाध्यक्ष)२) देवव्रत मुखर्जी- युनायटेड ब्रेवरीज लि.३) अनिरुद्ध हलदार- टीव्हीएस मोटार कंपनी लि.

जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी

१) विक्रम सखुजा, मॅडिसन कम्युनिकेशन्स प्रा.लि. (मानद खजिनदार)२) शशिधर सिन्हा, मीडिया ब्रांडस् प्रा.लि.३) श्रीनिवास के. स्वामी, आरके स्वामी बीबीडीओ प्रा.लि.३) आशिष भसीन, डेन्टस्यू एजिस नेटवर्क कम्युनिकेशन्स इंडिया प्रा.लि.होर्मुज मसानी- सरचिटणीस

लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांची एबीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांची या पदावर निवड झाली आहे. यापूर्वी मल्याळम मनोरमा माध्यम समूहाचे के.एम. मॅथ्यू व अमित मॅथ्यू या पिता-पुत्रांनी हे पद भूषविले होते. त्यानंतर आता लोकमत माध्यम समूहातून अशी निवड होण्याचा योग आला आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत