शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कटू सत्य ऐकण्याची सवय करा; स्वामींचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:08 IST

अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन थेट पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई: कटू सत्य ऐकण्याची तयारी ठेवा आणि प्रशासनातील अर्थतज्ज्ञांना घाबरवणं सोडा, अशा शब्दांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला आहे. देश आणि अर्थव्यवस्था चालवायची असल्यास ऐकून घेण्याची वृत्ती असायला हवी. मात्र मोदींनी अद्याप तशी सवय करुन घेतलेली नाही, असं स्वामी म्हणाले. स्वामी यांनी याआधीही देशातील अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मोदींच्या कामाची पद्धत पाहता खूपच कमी व्यक्ती त्यांच्यासमोर बोलू शकतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मनमोकळेपणानं त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. मात्र अद्याप मोदींनी अशी सवय लावून घेतलेली नाही,' अशा शब्दांमध्ये स्वामींनी मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य अवस्थेतून जात असताना स्वामींनी मोदींवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारनं कॉर्पोरेट करात कपात केली आहे. याशिवाय आणखीही पावलं उचलली आहेत. मात्र अद्याप याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसलेले नाहीत.नोटबंदी आणि घाई गडबडीत लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेतील मंदीला कारणीभूत असल्याचं स्वामी म्हणाले. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय नेमक्या समस्यांवर काम करत नसल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील संकट अधिक गहिरं होत असल्याचंही ते म्हणाले. 'अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्रिस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ काळासाठी स्वतंत्र धोरणं आखायला हवीत. मात्र सध्या अशी कोणतीही धोरणं अस्तित्वात नाहीत. पंतप्रधानांना अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगण्याची हिंमत प्रशासनातील एकही अर्थतज्ज्ञ करत नसेल. कारण मोदींना कटू सत्य ऐकण्याची सवय नाही,' असं स्वामी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEconomyअर्थव्यवस्थाGSTजीएसटीDemonetisationनिश्चलनीकरण