शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 03:13 IST

व्हिडीओ बनावट असल्याचा रेवन्नांचा दावा; पोलिसांत तक्रार

बंगळुरू : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू व हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडलच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला.  रेवन्ना विदेशात पळून गेल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. आपली बदनामी करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे, असा दावा करत रेवन्ना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नुकतेच २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या हासन लोकसभा मतदारसंघातून ते एनडीए आघाडीचे उमेदवार आहेत. व्हायरल झालेल्या काही व्हिडीओ क्लिप्समध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बिजय कुमार सिंह यांच्यासह एसआयटीत सहायक पोलिस महानिरीक्षक सुमन डी. पेनेकर, म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांचा समावेश आहे.

पित्रा-पुत्रावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एच.डी. रेवन्ना व नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात घरच्या स्वयंपाकी महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, तसेच माझ्या मुलींशी व्हिडीओ कॉल करून घाणेरड्या भाषेत बोलत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

चौकशीनंतर तथ्य बाहेर येऊ द्या

आपला पुतण्या आणि हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडलच्या चौकशीतून तथ्य बाहेर येण्याची वाट पाहूया. कोणी गुन्हा केला असल्यास त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रज्वल रेवन्ना यांनी देश सोडून जाण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.

- एच.डी. कुमारस्वामी,  माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

टॅग्स :Karnatakकर्नाटक