शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

राज्यभरात दुचाकीने करणार सौरउर्जेच्या वापराबाबत प्रचार पुण्याचा सौरभ लक्ष्मण कुंभार यांचा निर्धार

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

जळगाव- पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे रा.पुणे हे जळगावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटून सौरऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषद जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांना भेटून सौर ऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. त्यानंतर सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे यांचा जळगाव जिल्हा पत्रकार भवनात कार्यक्रम झाला. या महाराष्ट्र भ्रमण सौर ऊर्जा जनजागृती विषयी सत्कार केला. सौरभ कुंभार हे मागील वर्षापासून सौर ऊर्जा वापरासंबंधी प्रबोधनाचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमात ते मंत्रालय ते ग्रामपंचात स्तरावर भेट देऊन समक्ष या सौर ऊर्जेबाबत माहिती देऊन व शासनाकडून या विषयी कुठली मदत मिळते ते सुध्दा ते सांगतात हे सर्व प्रबोधन करुन जनतेत सौर ऊर्जेविषयी जनजागृती

जळगाव- पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे रा.पुणे हे जळगावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटून सौरऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषद जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांना भेटून सौर ऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. त्यानंतर सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे यांचा जळगाव जिल्हा पत्रकार भवनात कार्यक्रम झाला. या महाराष्ट्र भ्रमण सौर ऊर्जा जनजागृती विषयी सत्कार केला. सौरभ कुंभार हे मागील वर्षापासून सौर ऊर्जा वापरासंबंधी प्रबोधनाचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमात ते मंत्रालय ते ग्रामपंचात स्तरावर भेट देऊन समक्ष या सौर ऊर्जेबाबत माहिती देऊन व शासनाकडून या विषयी कुठली मदत मिळते ते सुध्दा ते सांगतात हे सर्व प्रबोधन करुन जनतेत सौर ऊर्जेविषयी जनजागृती करीत आहेत.
अरुण कोष्टी व मुकेश कुरील, नीलेश पाटील यांनी पत्रकार भवन येथे कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खुशाल सोनवणे, अक्षय अवस्थी, राहुल साळुंके, विनय निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.
वीज प्रत्येकाची गरज असल्याने विजेची बचत हीच एक प्रकारे विजेची निर्मिती आहे. भारनियमन व अपुरा वीज पुरवठा यामुळे सामान्य नागरिक हैराण होणारे हाल लक्षात घेऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून भारनियमन काळात विजेचा वापर करता यावा यासाठी पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरुन भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत १ डिसेंबर या कालावधित दुचाकीने प्रचार व प्रसार करणार आहे.
या प्रवासात साधारणत: ५ हजार ५०० किलोमीटर प्रवास ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी ५ हजार लोकांशी प्रत्यक्ष भेटी, ५० हजार लोकांशी अप्रत्यक्ष भेटी आणि जिल्हास्तरावर असलेले सहकार्‍यांची भेट घेऊन प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून प्रवासाचे नियोजन केलेले आहे.