शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:42 IST

मागे हटण्यास नकार; बैठका निष्फळ

चंडीगड : हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी आंदोलक शेतकरी अंबालाजवळील शंभू सीमेवर बॅरिकेडच्या दिशेने जात असताना त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एका वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, तीन केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलक संघटनांच्या नेत्यांशी बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत केलेली चर्चाही निष्फळ ठरल्याने आता हा तिढा सोडवण्यासाठी रविवारी पुन्हा चर्चा होणार आहे. 

पंजाबचे आंदोलक शेतकरीहरयाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू आणि खनौरी या दोन ठिकाणी अडकले आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसांतही शेतकरी आणि हरयाणा पोलिस कर्मचारी यांच्यात झटापट झाली होती. हरयाणातील अंबालाजवळील शंभू सीमेवर आंदोलन करणारे ६३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ग्यान सिंग यांना छातीत दुखत होते. त्यांना सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणखी एका शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला.

पाच तास चालली बैठक, पण...शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील चर्चेची पाच तास चाललेली तिसरी फेरी गुरुवारी रात्री उशिरा अनिर्णीत राहिली आणि आता दोन्ही बाजूंमधील बैठकीची पुढील फेरी १८ फेब्रुवारीला होणार आहे.  यापूर्वी ८ आणि १२ फेब्रुवारीला चर्चा झाली होती तीही अनिर्णीत राहिली होती.

‘भारत बंद’ला प्रतिसादसंयुक्त किसान मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला पंजाबमध्ये काही भागात प्रतिसाद मिळाला. बसगाड्या रस्त्यातच थांबल्याने प्रवाशांची शुक्रवारी गैरसोय झाली. उत्तर प्रदेशच्या काही भागांत निदर्शने झाली. दिवसभरात पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी एसकेएमच्या बॅनरखाली निदर्शनेही करण्यात आली.

पोलिस ‘हाय अलर्टवर’‘भारत बंद’च्या हाकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस ‘हाय अलर्ट’वर आहेत. सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानीत अनेक भागांत बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीHaryanaहरयाणा