शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 09:24 IST

मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा बसपाप्रमुख मायावती यांनी नुकतीच केली होती. मायावती यांच्या या निर्णयामुळे   2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या महिन्यात तीन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची योजना त्यांनी आखली आहे. त्यासाठी तिन्ही राज्यांमधील छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे. मात्र मायावतींच्या भूमिकेमुळे राहुल गांधींच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.राहुल गांधींनी अखेरच्या क्षणापर्यंत बसपासोबत आघाडीसाठी प्रयत्न केले. बसपाला सोबत घेण्यासाठी त्यांनी पक्षाच्या मध्य प्रदेशमधील कार्यकारिणीचीही मनधरणी केली होती. बुधवारी अखेरच्या क्षणी मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांना फोन करून आघाडीसाठी शेवटचा प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर कमलनाथ आणि बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांच्यात बैठक झाली. मात्र या चर्चेचा निष्कर्ष समोर येण्याआधीच बसपाप्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी न करण्याची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा करतानाच मायावती यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याने दोन्ही पक्षांमधील वातावरण अधिकच गढुळ झाले आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीRahul Gandhiराहुल गांधीmayawatiमायावती