शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

चंद्राला कवेत घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 02:41 IST

शास्त्रज्ञांचे केले कौतुक, विज्ञानात अपयश नव्हे, तर प्रयोग असतात; अवघा भारत तुमच्या पाठीशी

बंगळुरू : चांद्रयान २ मोहिमेला अपेक्षित यश न मिळाल्याने इस्रोमधील साऱ्या शास्त्रज्ञांचे काहीसे चेहरे पडले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक केले. विज्ञानात अपयश नसते, असतात ते प्रयोग आणि प्रयत्न. कधीही पराभव मानणाºया संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे, त्यामुळे केवळ मीच नव्हे, तर सारा भारत आणि सर्व भारतीय तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ , अशा शब्दांत पंतप्रधानांनी पुढील मोहिमांसाठी या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

चांद्रयान-२ चा अंतिम निकाल आपणा सर्वांच्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा प्रवास अतिशय उत्तम होता, असे सांगतानाच, या मोहिमेमुळे चंद्राला आपल्या कवेमध्ये घेण्याची इच्छा अधिक प्रबळ झाली असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. इस्रोच्या सेंटरमधून मोदी यांनी केलेले भाषण शास्त्रज्ञांना उद्देशून असले तरी त्यातून भारतीयांच्या मनातील अपयशाची भावनाही त्यांनी पुसून टाकली. त्यामुळे मोदी यांच्या भाषणानंतर देशभरातून इस्रो व त्यातील शास्त्रज्ञांना शाबासकी देणाºया व त्यांचे कौतुक करणाºया प्रतिक्रिया येऊ लागल्या.

तुम्ही अजिबात निराश होऊ नका, अवघा भारत तुमच्या पाठिशी आहे, तुम्ही केवळ चांद्रयान-२ मोहिमेसाठीच नव्हे, तर जगात भारताची मान ताठपणे उंचावण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-२ मोहिमेसाठी तुम्ही घेतलेले परिश्रम सर्वांनी पाहिले आहेत. तुम्ही अगदी झपाटल्याप्रमाणे रात्रन्दिवस काम करीत होता. त्यामुळे कदाचित आपला वेग काही काळासाठी कमी झाला असला तरी तो थांबलेला नाही आणि तुम्ही तो थांबू देणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे.

इस्रोप्रमुखांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेया भाषणानंतर सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात आले आणि प्रत्येकाचा हात हातात घेत त्यांना शुभच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुकही केले. त्यावेळी सारेच शास्त्रज्ञ काहीसे भावनाविवश झाले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना तर त्या क्षणी आपल्या भावना आवरताच आल्या नाहीत. मोदी यांनी त्यांना मिठी मारून त्यांच्या पाठीवरून अनेकदा हात फिरवला. त्याप्रसंगी सिवन यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. ते पाहून सारे शास्त्रज्ञही सद्गदित झाले होते. 

चांद्रयान-२ मोहिमेचा अंतिम टप्पा पाहण्यासाठी देशभरातून अनेक शाळकरी विद्यार्थी इस्रोमध्ये आले होते. त्या सर्वांना तो क्षण पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्षात तसे न घडल्याने तेही काहीसे हिरमुसले झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी या मुलांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी काही मिनिटे गप्पा मारल्या.

त्यावेळी एका मुलाने मला अंतराळवीर होण्याची इच्छा असल्याचे सांगताच, मोदी यांनी त्याला शाबासकी दिली. एका विद्यार्थ्याने आपणास राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचे सांगितले, तेव्हा मोदी यांनी ‘पंतप्रधान व्हायचे नाही का?’असा प्रश्न गमतीने केला. त्यावर सर्वांनाच हसू फुटले. यात काही विद्यार्थी भूतानचेही होते. पंतप्रधानांनी त्यांना इतर मुलांशी मैत्री झाली की नाही, असा प्रश्नही केला.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Narendra Modiनरेंद्र मोदी