त्र्यंबकेश्वर : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या शनिवारी (दि. १९) त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणार आहेत; मात्र येथील हिंदुत्ववादी महिला त्यांना कडाडून विरोध करणार आहेत. विशेष म्हणजे केवळ वर्तमानपत्रात मुलाखत दिली आहे. तसे पत्र देवस्थान ट्रस्ट, पोलीस प्रशासन आदिंना न दिल्याने त्यांच्या येण्याबाबत त्र्यंबकमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही त्र्यंबकला खबरदारीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (दि.१९) त्या त्र्यंबकला येतील की नाही, याबाबत शहरात संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र खबरदारी म्हणून त्र्यंबकच्या महिलांनी रणनीती आखली आहे. त्र्यंबकेश्वरच्या महिलांचे नेतृत्व करणार्या प्रभावती तुंगार यांनी सांगितले की, शनिवारी बैठकीचे नियोजन ठरल्याचे कळते. देसाईंना विरोध करण्यासाठी त्यांनी सतर्क राहण्याचे ठरविले आहे.दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थाननेही आपल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त केले आहे.----
देसाई आज त्र्यंबकला
By admin | Updated: March 19, 2016 00:03 IST