शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:35 IST

Deputy CM Eknath Shinde In Bihar: बिहारमधून अनेक लोक कामासाठी मुंबईत येतात. बिहारी लोक कष्टाळू म्हणून ओळखले जातात, अनेक कामे करण्यात ते अग्रेसर आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Deputy CM Eknath Shinde In Bihar: जे वोट चोरीचा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमीच देशाची फसवणूक केली आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेत, असे हे लोक आज इतरांना राजकारण शिकवत फिरत, अशी टीका करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएला समर्थन देण्याचे आवाहन केले.

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील बाकरपूर विधानसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंह यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. एनडीए सरकारने मागील काही वर्षांत बिहारमध्ये अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला. महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले. त्यामुळे बिहारला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचे तर पुन्हा एकदा राज्यात डबल इंजिन सरकारला संधी द्यावी लागेल, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा

एनडीए मधील पाच घटक पक्ष हे पाच पांडव असून, विरोधक म्हणजे कौरव आहेत, त्यामुळे आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा. एनडीएने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. बिहारमधून अनेक लोक कामासाठी मुंबईत येतात. काही घटना वगळल्या तर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते. मुंबईत बिहारएवढ्याच उत्साहात छठ पूजा साजरी केली जाते. बिहारी लोक कष्टाळू म्हणून ओळखले जातात, अनेक कामे करण्यात ते अग्रेसर आहेत. सर्व जण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. जसे मुंबईत ते एनडीए सोबत राहतात तसेच बिहार मध्येही एनडीएचे हात बळकट करावे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्याने तिथे वेगाने विकास झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत केली. तशीच मदत बिहारला देऊन ते बिहारला सक्षम करतील. डबल इंजिन सरकार राज्याची वेगाने प्रगती करू शकते, त्यामुळे बिहारला प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचे हात मजबूत करावे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : NDA is Pandavas, defeat Kauravas in election Kurukshetra: Shinde

Web Summary : Eknath Shinde urged support for NDA in Bihar, likening it to Pandavas fighting Kauravas. He highlighted NDA's development work, criticized opponents, and praised Bihari workers in Mumbai, advocating for a double-engine government for Bihar's progress.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना