शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:08 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली.

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत गौरव केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  शरद पवार यांनी  एकनाथ शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी असल्याचे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानावरुन महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही टीका केली जात आहे. दुसरीकडे आता ठाकरे गटाच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केल्याने संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं.

“ही सदिच्छा भेटच होती. मी नरेश म्हस्के, संजय नाहरजी आम्ही शरद पवार यांना भेटलो. मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री मी आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहे. मी मंत्री असल्याने आढावा घेण्यासाठी आलो होतो. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणं क्रमप्राप्त होतं. त्यांच्याशी साहित्य संमेलनाबाबतची चर्चा झाली,” असं उदय सामंत यांनी म्हटलं. 

टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं - एकनाथ शिंदे

“टीका करणाऱ्यांनी महापराक्रमी महादजी शिंदेंचा अपमान केला. साहित्य संमेलनातील साहित्यिकांना दलाल म्हणत त्यांचा अपमान केला. शरद पवार साहेब जे त्यांना आत्तापर्यंत वंदनीय होते, पण त्यांनी माझा सत्कार केल्यामुळे यांनी त्यांचाही अपमान केला. परंतु आम्ही आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही. जनता सुज्ञ असून चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राला परंपरा आहे, संस्कृती आहे. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, जनतेनं विधानसभेत यांना धडा शिकवला आहे, पण त्यातून यांनी काही बोध घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं,” असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत