शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक संबंधांपासून वंचित ठेवणे क्रूरतेचा कळस; बलात्काराचे खोटे आरोप घटस्फोटासाठी भक्कम कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 07:31 IST

पतीने दावा केला की, पत्नी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून घरातील कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी ठरली.

नवी दिल्ली : जोडप्याने एकमेकांना वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवणे, पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ किंवा बलात्काराचे खोटे आरोप करणे हा क्रूरतेचा कळस आहे. घटस्फोटासाठी हे एक भक्कम कारण असल्याचे एका खटल्याची सुनावणी करताना दिल्ली कोर्टाने म्हटले. न्यायाधीश सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने  पतीला घटस्फोट देण्याची परवानगी देणारा कौटुंबिक कोर्टाचा आदेश कायम ठेवला.

कोर्टाने म्हटले...nसहवास आणि वैवाहिक संबंध हे कोणत्याही वैवाहिक नात्याचे आधारस्तंभ आहेत हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. nजोडप्याने एकमेकांना संबंधांपासून वंचित ठेवण्यामुळे हा विवाह पुढे टिकू शकत नाही, हे सिद्ध होते. nवैवाहिक नातेसंबंधापासून वंचित ठेवणे हे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे.

पती म्हणतो...पतीने दावा केला होता की पत्नी विवाहानंतर सतत नाखूश असे. कितीही प्रयत्न केले, तरी ती त्याला जवळही येऊ देत नसे. त्याने पत्नीला आपल्यासोबत डॉक्टरांकडे येण्यास सांगितले असता, तिने त्यास नकार दिला. जोडप्याने एकमेकांना वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवणे हा क्रूरतेचा कळस आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. 

पतीने दावा केला की, पत्नी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून घरातील कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी ठरली. ती अनेकदा त्याला आणि कुटुंबाला न सांगता तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. तसेच तिने आत्महत्या करण्याचा आणि त्याला व त्याच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती.

२०१२ मध्ये लग्न केल्यानंतर हे जोडपे २०१४ पासून वेगळे राहत होते. यावरून हे सिद्ध होते की ते वैवाहिक संबंध राखण्यास असमर्थ होते. जवळपास नऊ वर्षांचा हा प्रकार अत्यंत मानसिक क्रौर्याचे उदाहरण आहे, असे कोर्टाने म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय