शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:38 IST

एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

यूपीच्या देवरियामध्ये एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी सरपंचाच्या तक्रारीवरून महिला सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी विभागाने महिलेला निलंबित केलं आहे.

सफाई कर्मचारी शीला देवी हिनेही सरपंच रवी प्रताप सिंह यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. हजेरी रजिस्टरवर सही न केल्याने सरपंचाचा महिलेचा राग होता, असे सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणामध्ये ADPRO श्रावण चौरसिया यांनी सांगितलं की, एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावातील सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एडीओ पंचायत यांच्याकडून तपास करण्यात आला. तपासाअंती, एडीओ पंचायतीला हे सत्य असल्याचं आढळून आलं. महिला सफाई कर्मचाऱ्याचं वर्तन नियमांविरुद्ध आहे. दोषी आढळल्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं.

देवरियाच्या पथरदेव विकास गटांतर्गत नेरुवारी गावात दोन सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्यामध्ये शीला नावाची महिलाही आहे. शीला वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचा आरोप आहे. याबाबत सरपंच रवी प्रताप सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर शीला संतापली.

२२ नोव्हेंबर रोजी महिला सफाई कर्मचारी आपल्या पे रोलवर सही घेण्यासाठी सरपंचाच्या घरी पोहोचली. यावर सरपंचाने ड्यूटी किती वाजता आहे अशी विचारणा केली. तर महिलेने रात्री ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत असल्याचं सांगितलं. हे उत्तर ऐकून सरपंचांनी ही बाब विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लिहून घ्यावी, असं सांगितल, कारण, ही कामाची वेळ नाही.

हे ऐकून महिला सफाई कर्मचारी शीला हिला राग आला आणि तिने चप्पल काढून सरपंचाला मारहाण केली, असा आरोप आहे. घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती विभागाला दिली आणि पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश