शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे प्राप्तिकर भरणा-यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 23:04 IST

5 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 82 लाख एवढा प्राप्तिकर लोकांनी भरला असून, प्राप्तिकराच्या वसुलीत 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

नवी दिल्ली, दि. 7 - मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावेळी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु केंद्र सरकारला नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. नोटाबंदीमुळे कर भरणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 5 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 82 लाख लोकांनी प्राप्तिकर भरला असून, प्राप्तिकराच्या वसुलीत 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्राप्तिकर भरणा-यांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाली आहे.गेल्या वर्षी 2 कोटी 26 लाख लोकांनी प्राप्तिकर भरला होता. यंदा त्या आकड्यात चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 9.9 टक्क्याइतकी वाढ नोंदवली गेली होती. आगाऊ कर भरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आगाऊ कर भरणा-यांच्या प्रमाणात 41.79 टक्क्यांची वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात लोक कर यंत्रणेच्या अंतर्गत आले असून, कर भरणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालनालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कर भरण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच काळा पैसा बाळगणारे आणि करचुकव्यावर लक्ष ठेवलं जातंय. अशा लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार असल्याचंही केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालनालयानं स्पष्ट केलं आहे. आकडेवारीनुसार यंदा वाढविलेल्या मुदतीत एकूण 2.82 कोटी करदात्यांनी प्राप्तिकराचे रिटर्न भरले. गेल्या वर्षी रिटर्न भरणा-यांची संख्या 2.26 कोटी होती. म्हणजेच यंदा रिटर्नमध्ये 24.7 टक्क्यांनी वाढ  झाली. त्याआधीच्या वर्षी ही वाढ फक्त नऊ टक्क्यांनी झाली होती. यंदा रिटर्न भरणा-यांमध्ये 2.79 कोटी व्यक्तिगत करदाते आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 2.22 कोटी होती. यावरून नोटाबंदीनंतर अधिक करदाते कराच्या कक्षेत आल्याचे दिसते.‘सीबीडीटी’च्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यक्तिगत करदात्यांनी केलेल्या अग्रिम करभरण्यात 41.79 टक्क्यांनी वाढ झाली. व्यक्तिगत करदात्यांच्या ‘सेल्फ अ‍ॅसेसमेंट टॅक्स’मध्येही 34.25 टक्क्यांनी वाढ झाली. सक्ती आणि जबरदस्तीची कारवाई न करता अधिकाधिक करदात्यांना कराच्या कक्षेत आणण्याचे आणि करचुकवेगिरी कमी करण्याचे उपाय यापुढेही सुरुच राहतील, असेही ‘सीबीडीटी’ने म्हटले.