शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घसरलेला जीडीपी ते रद्द झालेला तिहेरी तलाक महत्वाच्या घटनांनी भरलेला आणि भारलेला आँगस्ट महिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 08:50 IST

साधारणतः देशाचे वार्षिक बजेट सादर केले जाते किंवा पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो त्या महिन्यांमध्ये बाजारात तसेच इतर अनेक संस्थांमध्ये वेगाने हालचाली घडू लागतात.

मुंबई, दि. ७- साधारणतः देशाचे वार्षिक बजेट सादर केले जाते किंवा पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो त्या महिन्यांमध्ये बाजारात तसेच इतर अनेक संस्थांमध्ये वेगाने हालचाली घडू लागतात. अशा महिन्यांमध्ये संस्थात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी घडतात. मात्र यावर्षी आँगस्ट महिन्याने हा मान पटकावला आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेला तिहेरी तोंडी तलाकचा निर्णय किंवा घसरलेल्या जीडीपीची जाहीर झालेली आकडेवारी अशा अनेक घोषणा एकाच महिन्यात घडल्या. 

आँगस्ट महिन्याच्या अखेरीस २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाली. या तिमाहीत भारताचा जीडीपी ५.७ टक्क्यांवर आल्याचे दिसून आले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत जीडीपी ७.९ टक्के होता. खाणकाम क्षेत्र सोडल्यास सर्वच क्षेत्रामंध्ये वाढीचा वेग मंदावल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले. याबरोबरच रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० च्या ९९% नोटी परत आल्या असे जाहीर केले. तसेच परत आलेल्या नोटांचे मूल्य १५.२८ लाख कोटी असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही आकडेवारींवरुन केंद्र सरकारवर सध्या टीका सुरु आहे. 

आता यानंतर आँगस्ट महिना ख-या अर्थाने गाजला तो सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निर्णयांनी. यामध्ये पहिला निर्णय होता तो तिहेरी तलाक रद्द करण्याचा. वर्षानुवर्षे चाललेली तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाने देशातील मुस्लीम महिलांना मोठा दिलासा दिला. तर दुसरा निर्णय होता राईट टू प्रायव्हसीचा. खासगीपणाचा हक्क हा व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याते यानिर्णयात स्पष्ट करण्यात आले. कदाचित इतके महत्त्वाचे व समाजमनाला वळण लावणारे मोठे निर्णय न्यायालयाने एकाच महिन्यात पुर्वी फारसे दिले नसावेत. 

तर याच महिन्यात संसदेतही विशेष घडामोडी घडल्या. कोड आँन वेजेस २०१७ विधेयक संसदेत मांडले गेले व ते कामगारविषयक काम पाहणा-या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. तसेच बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेट अँक्ट २०१७ संसदेत मंजूर झाला. सरोगसी या नेहमी चर्चेत असणार्या मुद्द्यावरही स्थायी समितीने आपला अहवाल सादर केला. तसेच भारत- पाक संबंध, जेनेटिकली मोडिफाइड पिके, नँशनल इलेक्ट्रिसिटी पाँलिसी, वातावरणीय बदल व पिकांवरील संशोधन अशा अनेक विषयांवरचे समित्यांचे अहवाल सादर केले गेले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय