शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाही; घराणेशाहीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 11:39 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसंच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. पण, आपल्याकडे काहीजण त्याचं समर्थन करतात, असं व्यंकय्या नायडू त्यांनी म्हटलं.

नवी दिल्ली, दि. 16-  भारतातील घराणेशाहीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसंच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. पण, आपल्याकडे काहीजण त्याचं समर्थन करतात, असं व्यंकय्या नायडू त्यांनी म्हटलं. मी हे एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तीला उद्देशून बोलत नसल्याचंही व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना भारतात असलेल्या घराणेशाहीबद्दल वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याला व्यंकय्या नायडू यांनी उत्तर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना काँग्रेस पक्षातील घराणेशाहीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं होतं. 'एकट्या काँग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही. देशातील अनेक पक्षात आजही घराणेशाही चालते. असं बोलताना राहुल गांधी यांनी अखिलेश यादव, करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन तसंत अमिताभ बच्चन या सगळ्यांची उदाहरणं दिली होती. सगळीकडे घराणेशाही आहेच. एवढंच काय तर बॉलिवूड क्षेत्रात, व्यावसायिकांमध्येही घराणेशाही आहे. अभिषेक बच्चनपासून ते अंबानी कुटुंबियांपर्यंत सगळीकडे घराणेशाही पाहायला मिळते. इन्फोसिसही काही यापेक्षा वेगळे नाही, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. घराण्याचा वंशज आणि घराणेशाही या गोष्टी भारतीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचा त्यांचा दावा विसंगतीपूर्ण असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. तर अभिनेते ऋषी कपूर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ऋषी कपूर यांनी सलग तीन ट्विट करत राहुल गांधी यांना झापलं. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'राहुल गांधी. 106 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचं योगदान 90 वर्ष आहे. प्रत्येक पिढीला लोकांनी मेरिटच्या आधारे निवडलं आहे'. यानंतर केलेल्या दुस-या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 'देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी आहे - पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर. याशिवाय अजूनही'. असं ऋषी कपूर म्हणाले होते.