शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शबनमची फाशी थांबवण्याची मागणी; महंत परमहंस दास म्हणाले, "महिलेला फाशी दिली तर..."

By पूनम अपराज | Updated: February 22, 2021 14:33 IST

Amroha Murder Case : दुसरीकडे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे. 

ठळक मुद्देअयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्याचे आवाहन केले आहे.

प्रेमासाठी शिक्षिका असलेल्या शबनमने घरातीलच ७ लोकांची क्रूरपणे हत्या केली होती. कारण हे तिच्या घरातील लोक तिच्या प्रेमाच्या विरोधात होते. ती सलीम नावाच्या एका आठवी पास तरूणावर प्रेम करत होती.यूपीतील अमरोहा येथील बहुचर्चीत हत्याकांडातील दोषी शबनमच्या डेथ वॉरन्टवर कोणत्याही क्षणी हस्ताक्षर होऊ शकतात. लवकरच शबनमला मथुरा येथील तुरूंगात फासावर लटकवलं जाऊ शकतं. मात्र, अशातच शबनमचा मुलगा ताजने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे. 

अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्याचे आवाहन केले आहे. जर शबनमला फाशी देण्यात आली तर स्वातंत्र्यानंतर महिलेला फाशी देण्याची ही पहिलीच घटना असेल. महंत परमहंस दास यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा खूपच  महत्वाचे स्थान दिले आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही, तर दुर्दैवी आणि आपत्तींना निमंत्रण द्याल. तिचा गुन्हा माफ करण्यायोग्य नाही, परंतु स्त्री म्हणून तिला क्षमा केले पाहिजे हे खरे आहे.'महिलेला फाशी देणे दुर्भाग्यपूर्ण'महंत पुढे म्हणाले, 'हिंदू धर्माचे गुरू असल्याने मी राष्ट्रपतींना शबनम यांची दया याचिका स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुरुंगात तिच्या गुन्ह्याबद्दल तिने प्रायश्चित भोगले आहे. जर तिला फाशी देण्यात आली तर, हा इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण अध्याय असेल. आमची राज्यघटना राष्ट्रपतींना विलक्षण अधिकार देते, त्यांनी या अधिकारांचा उपयोग माफी देण्यासाठी करायला हवा. 'कुटुंबातील ७ सदस्यांची हत्या केली होती यूपीतील अमरोहा जिल्ह्यात १४ - १५ एप्रिल २००८ साली शबनमने प्रियकर सलीम याच्या मदतीने आपल्या  कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली होती. शबनम आणि सलीमला फाशी देण्यात येईल. जुलै 2019 पासून हे दोघे शबनम रामपूर तुरूंगात आहे.

टॅग्स :MurderखूनAyodhyaअयोध्याPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदUttar Pradeshउत्तर प्रदेश