शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत ड्रग्ज, पैशांचा महापूर! ४,६५० काेटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:55 IST

४५ टक्के वाटा केवळ नशेचा; आयाेगाची कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीत पैशांचा दुरुपयाेग राेखण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४,६५० काेटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरराेज सरासरी १०० काेटी रुपयांची जप्ती हाेत असल्याची माहिती निवडणूक आयाेगाने दिली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये जवळपास ४५ टक्के वाटा हा ड्रग्जचा आहे. 

आयाेगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४,६५८ काेटी रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेला मुद्देमाल जास्त आहे. लाेकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान सुरू हाेण्यापूर्वीच एवढा मुद्देमाल जप्त झाला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक जप्तीची कारवाई यावेळी हाेण्याच्या मार्गावर आहे. 

३,४७५ काेटी रुपयांचा मुद्देमाल २०१९च्या निवडणुकीदरम्यान जप्त केला हाेता. यंदा मतदान सुरू हाेण्यापूर्वीच हा आकडा पार झाला आहे.

या वर्षी ७५ टक्के वाटा ड्रग्जचा- या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालात ७५ टक्के वाटा हा ड्रग्जचा हाेता.- आयाेगाने लाेकसभा निवडणूक डाेळ्यांसमाेर ठेवूनच वर्षाच्या सुरुवातीपासून याकडे लक्ष केंद्रित केले हाेते.

सरकारी कर्मचाऱ्यांवर आयाेगाची कारवाईनिवडणुकीच्या दरम्यान राजकीय नेत्यांना प्रचारात मदत करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १०६ जणांवर कारवाई झाल्याचे आयाेगाने म्हटले आहे.

दरराेज सरासरी १०० काेटींचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. ३९५ काेटी रुपये राेख, ४८९ काेटी रुपयांचे मद्य आणि २,०६९ काेटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Drugsअमली पदार्थ