शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील हवा बनली आणखी विषारी; एनसीआरमध्ये इमारतींचे बांधकाम, पाडकामावर तात्पुरती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:08 IST

दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी वाढत्या वायू प्रदूषणाबरोबरच धुकेही दाटले होते.

नवी दिल्ली : दिवाळीत दिल्लीतील हवेचा दर्जा काही प्रमाणात सुधारल्याने दिल्लीकर सुखावले होते; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दिल्लीत शनिवारी हवेच्या दर्जाचा सरासरी निर्देशांक ३९७वर पोहोचला. प्रदूषणाची ही धोकादायक पातळी असून ते जानेवारी महिन्यापासूनचे सर्वाधिक प्रमाण आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण आणखी वाढू नये, यासाठी एनसीआर भागात इमारतींची बांधकामे व पाडकामावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी वाढत्या वायू प्रदूषणाबरोबरच धुकेही दाटले होते. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा सरासरी निर्देशांक सोमवारी ३१२, मंगळवारी ३०२, बुधवारी २७१, गुरुवारी ३५४ इतका होता. वायू प्रदूषणाचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी रविवारी एक बैठक बोलाविली आहे. त्यामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल. 

अत्यावश्यक गोष्टींना बंदी लागू नाही

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एनसीआर भागातील इमारतींच्या बांधकाम तसेच पाडकामावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय दि कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट  या केंद्र सरकारच्या संस्थेने घेतला. दिल्लीच्या एनसीआर भागातील सर्व यंत्रणांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश सीएक्यूएमने दिले आहेत. मात्र, ही बंदी संरक्षण, लष्कर, रेल्वे, मेट्रो रेल्वे आदी अत्यावश्यक गोष्टींच्या कामांना लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली