शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

दिल्लीचा २७0 कि.मी.चा नवा रिंग रोड वर्षअखेर

By admin | Updated: April 29, 2017 00:34 IST

दिल्ली महानगर वर्षअखेरीला मोकळा श्वास घेऊ शकेल. प्रदूषणाने काळवंडलेल्या आणि वाहनांच्या गर्दीने गुदमरलेल्या दिल्लीला

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीदिल्ली महानगर वर्षअखेरीला मोकळा श्वास घेऊ शकेल. प्रदूषणाने काळवंडलेल्या आणि वाहनांच्या गर्दीने गुदमरलेल्या दिल्लीला परिवहन मंत्री नितीन गडकरींनी शुक्रवारी हे शुभवर्तमान ऐकवले. येत्या डिसेंबर पासून परराज्यातून दिल्लीत दाखल होणाऱ्या आणि लगेच अन्य राज्यांकडे कूच करणाऱ्या हजारो ट्रक्स यापुढे दिल्लीत दाखल होणारच नाहीत. या महानगरात विनाकारण शिरणाऱ्या तमाम वाहनांसाठी दिल्लीच्या दशादिशांना व्यापणाऱ्या २७0 कि.मी. अंतराच्या पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्सप्रेसवे चे ६0 टक्के काम पूर्ण झाले आहे. दिल्लीला वेढणारा हा नवा रिंग रोड वर्षअखेरीला तयार होईल व पंतप्रधानांच्या हस्ते तो राष्ट्राला अर्पण केला जाईल, असे उद्गार नितीन गडकरींनी पत्रकारांशी बोलतांना काढले.पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्सप्रेसवे (ईस्टर्न अँड वेस्टर्न पेरिफेरल एक्सपे्रसवे) असे या महत्काकांक्षी प्रकल्पाचे नाव असून २७0 किलोमीटर्सच्या या रिंग रोडचे १८३ किलोमीटर्सचे अंतर हरयाणात तर ८७ किलोमीटर्सचे अंतर उत्तरप्रदेशात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर दिल्लीजवळ पूर्व एक्सप्रेसवे हा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त देशातला दुसरा एक्सप्रेसवे ठरणार आहे. शुक्रवारी गडकरींनी दिल्लीतल्या ५0 पत्रकारांसह या नव्या रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी केली व पत्रपरिषदेनंतर हेलिकॉप्टरद्वारे कामाच्या प्रगतीचे निरीक्षणही केले. या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पत्रकारांशी हितगुज करतांना गडकरी म्हणाले, हरयाणातल्या कुंडली गावापासून पलवलपर्यंत १३५ किलोमीटर्सच्या अंतरात हा अर्धवर्तुळाकार पूर्व एक्सप्रेसवे पसरला असून याच्या दोन्ही टोकांना दुसऱ्या १३५ किलोमीटर्स अंतराच्या पश्चिम एक्सप्रेसवे ची उर्वरित दोन टोके जोडली गेली आहेत. परिणामी या वर्तुळाकार मार्गाचे २७0 किलोमीटर्सच्या भव्य रिंग रोडमधे रूपांतर झाले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४४१८ कोटी खर्च आला आहे तर भूसंपादनासाठी बाजारभावानुसार ५९00 कोटी जमीन मालकांना अदा करण्यात आले आहेत. नद्यांचे ड्रेझिंग करून वाळू फुकट मिळवणे, जमशेदपूरला लोखंडावर प्रक्रिया करतांना वाया जाणारे आॅईल स्लॅग, औष्णिक प्रकल्पांची कोल अ‍ॅश इत्यादींचा वापर रस्त्यात भर घालण्यासाठी करणे, शेतकऱ्यांना मोफत शेततळी तयार करून देतांना खोदकामातून मिळालेली माती विनामूल्य दरात रस्त्त्यात भर घालण्यासाठी वापरणे, यात शेतकरी आणि सरकार दोघांचाही लाभ आहे, असे गडकरी म्हणाले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेला एक्स्प्रेस वेअत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेल्या या एक्सप्रेसवे वर हायवे मॅनेजमेंट सिस्टिमसह विशिष्ट टप्प्यांवर वाहनतळ, आहार, विश्रांती आणि इंधनासह साऱ्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावण्यात येणार असल्याने हा मार्ग हिरवाईने सजलेला असेल. यमुना व हिंडन नद्या आणि आग्रा कॅनॉलवर तीन मोठे पूल, तसेच जागोजागी ७७ अंडरपास तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यावर अपघाती मृत्यू अथवा प्राणहानी होऊ नये यासाठी सुरक्षा विषयक साऱ्या दक्षता घेण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी परिवहन मंत्रालयाने अनेक कल्पक गोष्टी राबवल्या.