शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:32 IST

अनेक लोकांनी स्थलांतरास केली सुरुवात; ईशान्य दिल्लीतील लोकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची आग शमली असली तरी स्थानिक तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चांदबाग, मुंगानगर, करावलनगर, घोंडा व गोकुलपुरीमध्ये घडलेल्या हिंसाचारापासून अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कामासाठी, व्यवसायासाठी या भागात रहिवासी असलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे.अनेकजण आपल्या कुंटुबियांना खासकरून ज्येष्ठ महिला व मुलांना पाहुण्यांकडे, तसेच आपल्या मूळगावी परत पाठवत आहेत. दुसºया राज्यातून नोकरीसाठी आलेल्या लोकांनीशहरातील दुसºया परिसरात घराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.आता वातावरण शांत झाले असले तरी अचानक कधीही जमाव एकत्र येऊ शकतो. गोळीबार, घोषणाबाजी सुरू होऊ शकते. घरातील लहान मुले घाबरून सतत काय चाललेय, हे विचारायची. त्यामुळे मुले व पत्नीला लखनऊ येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले, अशी माहिती चांदनगर येथील रहिवासी आरीफ यांनी दिली आहे.घरे रिकामी करण्यास सुरुवातघोंडा परिसरात जे लोक भाडेतत्त्वावर राहत होते, त्यांनीही घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावी जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मौजपूर परिसरातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांना आपल्या गावी परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती रफि क मोहम्मद यांनी दिली आहे.कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर किमान पुरुषांना निर्धास्तपणे कामाचा शोधही घेता येईल, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली