नवी दिल्ली: दिल्लीत हिंसाचार सुरू असताना पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या हिंसाचारादरम्यान शाहरुखचा फोटो व्हायरल झाला होता. त्याला अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या शामलीमधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शाहरुखनं पोलिसांच्या दिशेनं पिस्तुलच रोखलं नव्हतं, तर त्यानं आठ राऊंड फायरदेखील केल्या होत्या. अटकेपासून वाचण्यासाठी तो फरार झाला होता.
Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:55 IST
व्हिडीओ व्हायरल होताच शाहरुख कुटुंबासोबत झाला होता फरार
Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक
ठळक मुद्देशाहरुखला उत्तर प्रदेशमधल्या शामलीमधून अटकपोलिसावर पिस्तुल रोखत आठ राऊंड केल्या होत्या फायर व्हिडीओ व्हायरल होताच शाहरुख झाला होता फरार