शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : चिथावणीखोरांवर कारवाई करण्यात यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 02:55 IST

प्रक्षोभक भाषणांमुळे मागणी

नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण करून समाजात तेढ निर्माण करणारांविरोधात कठोर कारवाईसाठी विधि आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करून कायदा करण्याची मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.भाजप नेते अ‍ॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराआधी काही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर लगेचच जनहित याचिका दाखल झाली. गृह मंत्रालय व कायदा मंत्रालय यांनी विधि आयोगाला २६७ व्या अहवालावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विधि आयोगाने प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर कारवाईसाठी मार्च २०१७ मध्ये हा अहवाल सरकारला सादर केला होता.प्रक्षोभक भाषणांच्या संकल्पनेचे विश्लेषण करून या समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाला अधिक अधिकार देण्याबाबत संसदेत शिफारस करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये विधि आयोगाला केली होती. विधि आयोगाने प्रक्षोभक भाषणांसदर्भात भारतीय कायदा आणि परदेशी कायदा यांचे विश्लेषण केल्यानंतर अहवाल सादर करताना सांगितले की, भारतीय दंड संहितेत या समस्येवर उपाय योजण्यासाठी नवीन तरतुदी करणे आवश्यक आहे. आयोगाने भारतीय दंड संहिता आणि दंड प्रक्रिया संहितेत संशोधन करून कलम ‘१५३ क’ आणि कलम ‘५०५ अ’ जोडण्याची शिफारस केली होती.अभिव्यक्ती स्वातंत्र हे नव्हेप्रक्षोभक भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही दोन परस्परविरोधी आव्हाने आहेत. या आव्हानांपासून समानता दूर आहे. कारण समाजातील द्वेषाला प्रोत्साहन देण्यास मान्यता नसणे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य यांच्यात मोठे अंतर आहे, असे या अहवालात म्हटले आहे.अहवालात अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटन या देशांच्या कायद्याचीही माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय