शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence:दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:59 IST

Delhi Violence News : दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगळीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून  राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनांना हिंसक वळण लागून दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत दिल्लीती सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. 

सोनिया गांधी म्हणाल्या, 'कटकास्थान रचून दिल्लीत हिंसाचार घडवला गेला आहे. भाजपाचे अनेक नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे आपण पाहिलेच होते. दरम्यान, दिल्लीत हिंसाचार माजल्यानंतर ७२ तासांपर्यंत दिल्ली पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या काळात १८ जणांचा बळी गेला. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. शेकडोजण रुग्णालयात दाखल आहेत. अनेकांना गोळी लागली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीमधील गल्लीबोळात अजूनही हिंसाचार सुरू आहे. दिल्लीत आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहे. या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. '

' दिल्लीतील हिंसाचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारही तितकीच जबाबदार आहे. शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली सरकारने प्रशासनाला सक्रिय केले नाही. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचार ही केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित अपयशाचा परिणाम आहे, ' असे सोनिया गांधी म्हणाल्या. 

 

 

टॅग्स :delhiदिल्लीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शहा