शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांच्याविरुद्ध 65 उमेदवार रिंगणात; वृत्तवाहिनीच्या मालकासह वकील, शिक्षकाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 16:21 IST

केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे.  यामध्ये काही वकिल आहेत, तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक. मंगळवारी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना 65 उमेदवारांनी आव्हान दिले आहे.

केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे.  यामध्ये काही वकील आहेत, तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक. मंगळवारी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. केजरीवाल यांना देखील कित्येक तास प्रतीक्षा करावी लागली होती. त्यांच्या आधी 40 हून अधिक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये एकाचे नाव योगी माथूर आहे. ते येथील स्थानिक वृत्तवाहिनीचे मालक आहेत. माथूर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मी अरविंद केजरीवाल यांना पराभूत करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  केजरीवाल मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नसल्याचे त्यांनी सांगितले.  

के. बंसल यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. बंसल व्यवसायाने वकील आहेत. भारतीय लोकशाही पक्षाचा आपण सदस्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी केवळ आश्वासने दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिक्षक पंकज कुमार देखील केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहेत. कामगार आणि बस वाहकांच्या नोकऱ्यांच्या धोरणांमध्ये बदल करण्यासाठी पंकज कुमार यांना निवडणूक जिंकायची आहे.