शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video - कालकाजी मंदिरात जागरण दरम्यान स्टेज कोसळला; चेंगराचेंगरीत 17 जखमी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 10:28 IST

कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही

दिल्लीतील कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात देवीच्या जागरणाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये रात्री 12.30 च्या सुमारास 1500 ते 1600 लोकांची गर्दी जमली होती. याच दरम्यान, लोक आयोजक आणि व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढले, त्यानंतर स्टेज खाली पडला. या दुर्घटनेत स्टेजखाली बसलेले 17 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एका महिलेचा मृत्यू 

जखमी झालेल्या 45 वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर बी प्राक पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याच दरम्यान, मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.

बी प्राक म्हणाला की, दुर्घटना झाली त्या कालकाजी मंदिरात मी गेलो होतो. लोक जखमी झाले आहेत, मला आशा आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत. व्यवस्थापकांनी काळजी घ्यायला हवी होती.

जागरण हा खासगी कार्यक्रम होता - पोलीस अधिकारी

'आज तक'ला सांगताना दिल्ली पोलीस अधिकारी म्हणाले, 'हे जागरण 26 वर्षांपासून सुरू होते. मात्र आता आयोजकांनी याची स्केल वाढवली ​​होती. जागरण हा एक खासगी कार्यक्रम होता, ज्यात गर्दीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आयोजकांची होती. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस तैनात आहेत. या जागरणासाठी एका कंपनीकडून एडिशनल फोर्स मागवण्यात आली होती. 

आयोजनाला परवानगी नव्हती - पोलीस 

हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असंही पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :delhiदिल्लीTempleमंदिर