शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

2000 कोटी रुपयांचा घोटाळा! 'या' प्रकरणात मनीष सिसोदियांना अटक होण्याची AAP ला वाटतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:19 IST

माध्यमांसोबत बोलताना आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, सिसोदिया यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या सर्व तपास यंत्रणा, आयकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), दिल्ली पोलीस आणि सीबीआयला 'बनावट' प्रकरणांची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर, आता आपल्या सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होऊ शकते. असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला. एवढेच नाही, तर सिसोदिया यांना काही खोट्या प्रकरणात अडकवले जाऊ शकते, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. आता, सिसोदिया यांना कोणत्या प्रकरणात कारागृहात टाकले जाऊ शकते, हेही आम आदमी पक्षाने सांगितले आहे. आपने दावा केला आहे, की सिसोदिया यांना अडकवण्यासाठी केंद्राने 3 वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण उकरून काढण्याचा कट आखला आहे.

माध्यमांसोबत बोलताना आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, सिसोदिया यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या सर्व तपास यंत्रणा, आयकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), दिल्ली पोलीस आणि सीबीआयला 'बनावट' प्रकरणांची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळांच्या कामांमध्ये घोटाळ्याची तक्रार -यावेळी आतिशी यांनी कथित दस्तऐवज दाखवले, यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दिल्ली भाजपचे नेते हरीश खुराना आणि नीलकांत बक्षी यांच्याकडे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात अधिकची माहिती आणि कागदपत्रे मागितली होती. या दोन्ही भाजप नेत्यांनी, सिसोदिया आणि जैन यांचा शाळांच्या बांधकामातील 2000 कोटी रुपयांचा घोटाळ्यात सहभाग होता, अशी तक्रार केली होती. ही तक्रार 2 जुलै 2019 रोजी नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली होती. यानंतर ती एसीबीकडे कडे पाठविण्यात आली होती.     3 वर्षांपासूनकुठे होते प्रकरण - आतिशी म्हणाल्या, “गेले 3 वर्षं हे प्रकरण कुठे होते? यात भ्रष्टाचार झालेला नाही हे सर्व यंत्रणांना माहीत आहे. यामुळे हे प्रकरण पुढे सरकलेच नाही. केंद्र आम आदमी पक्षाच्या आमदारांमागे लागले आहे?" असा सवालही यावेळी आतिशी यांनी केला.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीSchoolशाळा