शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Riots: दिल्ली दंगलीत पहिली शिक्षा, दरोडा आणि जाळपोळप्रकरणी एकास 5 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:23 IST

25 डिसेंबर 2020 रोजी मनोरी नावाच्या महिलेच्या घरात दरोडा टाकून आग लावण्यात आली होती.

नवी दिल्ली:दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगल आणि हिंसाचाराप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने दिनेश यादव नावाच्या व्यक्तीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पक्षकारांची बाजू मांडणारे अधिवक्ता आरसीएस भदौरिया यांनी याची पुष्टी केली. यादववर एका महिलेचे घर लुटणे आणि आग लावल्याचा आरोप आहे.

दिल्लीच्या गोकलपुरी येथील भागीरथी विहारमध्ये मनोरी या 70 वर्षीय महिलेच्या घरात चोरी आणि आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने त्याच भागातील रहिवासी असलेल्या दिनेश यादव याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ईशान्य दिल्लीतील भीषण दंगलीतील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे.

महिलेने कसाबसा जीव वाचवला25 डिसेंबर 2020 रोजी मनोरी नावाच्या महिलेच्या घरात दरोडा टाकून आग लावण्यात आली होती. दंगलखोरांनी त्यांची गुरेही चोरुन नेली होती. 70 वर्षीय मनोरीने छतावरुन उडी मारली आणि हिंदू कुटुंबाच्या घरात लपून आपला जीव वाचवला होता. त्यानंतर पोलिसांनी कसेबसे त्या महिलेच्या कुटुंबीयांना वाचवले होते. दंगलीनंतर संपूर्ण कुटुंब 2 आठवडे दिल्लीबाहेर होते.

पोलिसांचे जबाब महत्वाचेया प्रकरणी न्यायालयाने 2 पोलिसांचे जबाब महत्त्वाचे मानले आहेत. त्यांनी सांगितले की, दिनेश हा हिंसाचार करणाऱ्या जमावाचा भाग होता. मात्र, दिनेशला मनोरीचे घर जाळताना दिसले नाही. तथापि, न्यायालयाने म्हटले आहे की जर कोणी बेकायदेशीर जमावाचा भाग असेल तर तो इतर दंगलखोरांप्रमाणेच हिंसाचारासाठी तितकाच जबाबदार आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीdelhi violenceदिल्लीCourtन्यायालय