शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:16 IST

Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे सत्ताधारी आप सरकारकडून महिला आणि वृद्धांसाठी दोन योजना सुरू केल्या जात आहेत. त्याचवेळी भाजपने आप सरकारविरोधात आरोपपत्र जारी केले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि प्रवीण खंडेलवाल या भाजप नेत्यांनी एका कार्यक्रमात हे आरोपपत्र जाहीर केले. यावेळी विजेंद्र गुप्ता, रमेश बिधुरी, आरती मेहरा आणि सरदार आरपी सिंह यांसारखे इतर मोठे नेतेही उपस्थित होते.

भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. अनुराग ठाकूर म्हणाले की, "आप सरकारने यमुना नदी इतकी प्रदूषित केली आहे की, ती दुर्गंधीयुक्त, फेसाळ आणि विषारी झाली आहे. मला आठवते २०२२ मध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले होते की पुढच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०२५ च्या निवडणुकीपूर्वी ते लोकांसोबत यमुना नदीत डुबकी मारतील." 

याशिवाय, १० वर्षे झाली आणि २०२५ मध्ये जायला फक्त १० दिवस उरले आहेत, यमुना स्वच्छ झाली का?  असा सवाल सुद्धा अरविंद केजरीवाल यांना केला आहे. तसेच, 'कान्हा तेरी यमुना काली हो गई, केजरीवाल के पाप धोते-धोते', असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. अनुराग ठाकूर म्हणाले की, यमुना आता इतकी प्रदूषित झाली आहे की, येथे सण साजरे करणेही बंद झाले आहे. वायुप्रदूषण आणि खराब सांडपाणी व्यवस्थेमुळे दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होत आहेत. पाणी प्रदूषित झाले आहे. आज दिल्ली वाचवण्याची आणि अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचार संपवण्याची वेळ आली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून प्रत्युत्तर!दरम्यान, भाजपने 'आप' सरकारविरोधात आरोपपत्र जारी केल्यावर आप प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपकडे निवडणूक लढवण्याचा कोणताही अजेंडा नाही. गेल्या ५ वर्षांत दिल्लीसाठी काय केले, हे त्यांनी दिल्लीतील जनतेला सांगावे. वीज, पाणी, महिलांचा प्रवास, रस्ते आणि इतर अनेक बाबतीत आपने दिल्लीच्या लोकांसाठी खूप काही केले आहे. तसेच, या लोकांनी काय काम केले आहे? दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. आता ते निवडणुकीसाठी आले असताना माझ्यावर आरोपपत्र जारी करत आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री चेहरा नाही, असे केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAnurag Thakurअनुराग ठाकुरArvind Kejriwalअरविंद केजरीवाल