शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

बिभवकुमारला घेऊन दिल्ली पोलिस मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:38 IST

बिभवकुमारने त्याचा आयफोन-१५ मोबाइल फॉरमॅट केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुंबईत बिभवकुमार जिथे-जिथे गेला आणि विविध लोकांना भेटला, तिथे पोलिस त्याला घेऊन जाणार असून, संबंधितांचे म्हणणे नोंदवून घेणार आहे. दरम्यान, बिभवकुमारची पाच दिवसांची कोठडी गुरुवारी संपणार आहे.

नवी दिल्ली : स्वाती मालीवाल प्रकरणत आरोपी बिभवकुमार चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ठपका दिल्ली पोलिसांनी ठेवला. पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांनी बिभवकुमारला मुंबईला नेले. 

बिभवकुमारने त्याचा आयफोन-१५ मोबाइल फॉरमॅट केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुंबईत बिभवकुमार जिथे-जिथे गेला आणि विविध लोकांना भेटला, तिथे पोलिस त्याला घेऊन जाणार असून, संबंधितांचे म्हणणे नोंदवून घेणार आहे. दरम्यान, बिभवकुमारची पाच दिवसांची कोठडी गुरुवारी संपणार आहे.

’पाप तुमचे आणि आरोप आमच्यावर?’ - स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामागे केंद्रातील सत्ताधारी असल्याचा आपचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी खोडून काढला.- केजरीवाल घटनेवेळी निवासस्थानी नसतील, तर त्यांनी १३ मे रोजीचे वेळापत्रक जाहीर करावे. खासदार, मुख्यमंत्री, निवासस्थान, स्वीय सहायक सर्व ‘आप’चेच. हे पाप तुमचे व आरोप आमच्यावर का? असा सवाल त्रिवेदी यांनी केला. ...........भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

जितेंद्र प्रधानलोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : किर्गिझस्तानमध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान तेथे भारतातील तब्बल १५ हजार तरुण अडकले आहेत. यात महाराष्ट्र, राजस्थानमधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सतत हिंसाचार सुरू असल्याने आता भारतीय तरुण भीतीच्या छायेखाली वावरत असून, त्यांनी कुटुंबाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. तरुणांनी सांगितले की, होस्टेलमध्ये घुसून हिंसाचार करणारे अतिशय बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत.

भारतीय टार्गेटवर- बिश्केकमध्ये हिंसक जमाव वसतिगृहांना टार्गेट करत आहे. - या वसतिगृहांमध्ये भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानसह अनेक देशांतील विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि भारतीय विद्यार्थी टार्गेटवर आहेत.

येथे करा संपर्कमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली आहे. सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ९९६५५५७१००४१ हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.

नेमके काय झाले? एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली. व्हिडीओत प्रामुख्याने पाकिस्तान आणि इजिप्तमधील विद्यार्थी दिसत आहेत. १३ मेच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. लोक विद्यार्थ्यांना इतके मारत आहेत की यात विद्यार्थी बेशुद्ध झालेले दिसत आहेत.