शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत घुसखोरी करण्याचा हेतू काय होता? दिल्ली पोलिसांनी कोर्टात सगळे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 18:36 IST

Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसदेत घुसखोरी प्रकरणी महत्त्वाची माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टाला दिली.

Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसदेत घुसखोरी केल्यानंतर लोकसभा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. यानंतर या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा मास्टरमाइंट असलेला ललित झा याने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ललितला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ललितलाही ७  दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी दोन जणांनी लोकसभा सभागृहात गोंधळ घातला. यामुळे एकच खळबळ उडाली. या दोघांनी सभागृहात स्मोक अटॅक केला. यानंतर सर्वच खासदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी विरोधकांनी केंद्रावर सडकून टीकाही केली. परंतु, संसदेत घुसखोरी करण्याचा नेमका हेतू काय होता, स्मोक अटॅक का करण्यात आला, याबाबत पोलिसांनी दिल्लीतीलन्यायालयात माहिती दिली. 

संसदेत घुसखोरी करण्याचा हेतू काय होता?

पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, ललित झा हा मास्टरमाइंड आहे. त्यामुळे या कटामागे किती लोक होते हे शोधण्यासाठी त्याच्या कोठडीची गरज आहे. पुरावे गोळा करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये जावे लागणार आहे. या कटात वापरलेले मोबाइलही जप्त करायचे आहेत. ललित झा याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. यानंतर ललित झा याची चौकशी करण्यात आली. या कटातील संपूर्ण सहभाग उघड करताना ललितने तोच मास्टरमाइंड कसा आहे हे सांगितले. ललितने या कटामागील सांगितलेला हेतू न्यायालयात सांगू शकत नाही,  असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. 

दरम्यान, आम्हाला दाव्याची सत्यता आणि त्याच्या सहभाग याबाबत अधिक तपास करायचा आहे. सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे आले याचाही शोध घ्यायचा आहे, असे दिल्ली पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी ललित झा याची १५ दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ललित झा याची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाdelhiदिल्लीCourtन्यायालय