शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:50 IST

अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांना सीमेपार त्यांच्या देशात पाठवण्याची भारतीय सैन्याची मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे. नुकतीच दिल्लीतून ३८ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही महिला आणि लहान मुले यांचा देखील समावेश आहे. दिल्लीमध्ये संसार थाटण्यापूर्वी या लोकांनी बिहार आणि नुहमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला होता. या लोकांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. 

बिहारमध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न केला!

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या ताब्यात घेतलेले घुसखोर आधी हरियाणाच्या नुहमध्ये आणि नंतर बिहारमध्ये देखील गेले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले. या लोकांनी सुरुवातीला बिहारमध्ये मुक्काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या भागांमध्ये त्यांना आपला जम बसवता आला नाही. या ठिकाणी काहीच काम न मिळाल्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथल्या करखान्यांमध्ये काम करू लागले. इतकंच नाही तर, तिथेच झोपडी वजा घरे बांधून अवैधरित्या राहू लागले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये काही लहान मुले आणि महिला देखील सामील आहेत. सगळ्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेली होती. या लोकांकडे आवश्यक कागदपत्रे देखील नव्हती. 

शेकडो लोकांना मायदेशी धाडलं!

बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत शेकडो बांगलादेशी पकडले गेले आहेत. अनेकांना बांगलादेशला परत पाठवण्यात आले आहे. या लोकांच्या अटकेमुळे घुसखोरांना बनावट आधार कार्डसह विविध प्रकारची कागदपत्रे पुरवणारे अनेक नेटवर्क उघड झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्य दलाची ही मोहीम आणखी तीव्र झाली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवानdelhiदिल्ली