शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत अग्नितांडव, २७ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून नुकसान भरपाईची घोषणा, मालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:45 IST

या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं.

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, १२ जण जखमी झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं. हळूहळू आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० हून अधिक गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या इमारतीला अग्निशमन विभागाची एनओसीदेखील नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे.

या इमारतीत पहिल्या मजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं, तर दुसऱ्या मजल्यावर वेअर हाऊस आणि तिसऱ्या मजल्यावर लॅब होती. दरम्यान, दुसऱ्याच मजल्यावर सर्वाधिक जीवितहानी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर मोटिवेशनल स्पीच सुरू होती. या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी अनेक कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय छतावर एक छोटा फ्लॅटही तयार करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्या घराचा मालक अद्याप फरार आहे. मनिष लाकरा असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात निरनिराळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० पेक्षा अधिक बंब घटनास्थळीयामध्ये अग्निशमन दलाच्या कोणत्याही जवानाला इजा झाली नाही. सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी तैनात होत्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, ५० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं, तर २७ लोकांची मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, रात्री ११ वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आल्याचंही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं.नुकसान भरपाईची घोषणा"दिल्लीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाईल,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

टॅग्स :delhiदिल्लीfireआगNarendra Modiनरेंद्र मोदी