शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:52 IST

Kailash Gahlot quits AAP : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

Kailash Gahlot quits AAP : नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.

आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवताना कैलाश गेहलोत यांचेही नाव या पदासाठी पुढे येत होते. मात्र, या मोठ्या जबाबदारीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती. 

दरम्यान, आतिशी सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात आपच्या अंतर्गत समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच, यावर मात करण्याची गरज असल्याचे कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून झालेल्या विवादाचा संदर्भ देताना त्यांनी शीशमहल असा शब्दाचा वापर केला आहे.

वचनबद्धता पूर्ण करण्यात अपयशी - कैलाश गेहलोत याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश कैलाश गेहलोत यांनी अधोरेखित केले. आम्ही जनतेला स्वच्छ यमुनेचे आश्वासन दिले होते, पण ती वचनबद्धता पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचे कैलाश गेहलोत यांनी सांगितले आहे. तसेच, कैलाश गेहलोत पुढे म्हणाले की, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील सततचा संघर्ष शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी