शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi MCD Election Results 2022: "देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपाला हरवले’’, आपचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:18 IST

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली एमसीडी निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने १३४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली एमसीडी निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने १३४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाचा पराभव झाला आहे. भाजपाला केवळ १०४ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, या विजयानंतर देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपाला हरवले असा खोचक टोला आम आदमी पक्षाने भाजपाला  लगावला आहे. 

एमसीडीमधील विजयामुळे आम आदमी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चड्डा यांनी या निकालांनंतर भाजपाला खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने काम आणि विकासाला मत दिले आहे. आपण काम करणाऱ्यांनां मतं देतो, बदनाम करणाऱ्यांना देत नाही, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे, असे राघव चड्डा म्हणाले.

एमसीडीमध्ये आप आणि भाजपामध्ये थेट लढाई होती. भाजपाने ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री आणि ईडी व सीबीआयलाही मैदानात उतरवले होते. मात्र अखेरीस सत्याचाच विजय झाला. काँग्रेसने आधी दिल्लीत १५ वर्षे ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला पराभूत केले. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

भाजपाला दिल्लीच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे. जे विकासासाठी काम करतात. त्यांनाच जनतेने मत दिले आहे. दिल्लीने आज तो चिखल साफ केला आहे जो अरविंद केजरीवाल यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आम्ही दिल्लीला जगातील सर्वात सुंदर शहरामध्ये बदलणार आहोत. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली