शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-लखनऊ 'तेजस' एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 10:18 IST

रेल्वे खासगीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी  रेल्वे मंत्रालयाकडून 100 दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित करण्यात आले.

ठळक मुद्देदिल्ली-लखनऊ 'तेजस' एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन'तेजस' एक्स्प्रेस तासाला 200 किलोमीटर धावतेविवेक देबरॉय समितीच्या शिफारशीवरुन खासगीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी ट्रेन चालू करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावेळी खासगीकरण करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, याला रेल्वे युनियनने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता असे समजते की, दिल्ली - लखनऊ दरम्यान सुरु असलेली तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन होणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला 10 जुलै रोजी अंतिम स्वरुप प्राप्त होणार असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, रेल्वे खासगीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी  रेल्वे मंत्रालयाकडून 100 दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित करण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला दोन खासगी ट्रेन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरुन स्पष्ट संकेत मिळत होते की, केंद्र सरकार रेल्वेला खासगीकरण करण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे, असा आरोप नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेने (NFIR) केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन होणार आहे. 

तेजस देशातील पहिली अशी ट्रेन आहे की, ती तासाला 200 किलोमीटर धावते. तेसजच्या प्रत्येक डब्याला बनवण्यासाठी 3 कोटी 25 लाख रुपये इतका खर्च आला आहे. तसेच, यामध्ये स्वयंचलित प्लग टाइप दरवाजे बसविण्यात आले आहेत. म्हणजेच, मेट्रो ट्रेनचे ज्यापद्धतीने दरवाजे बंद होतात, त्याचप्रमाणे तेजस एक्स्प्रेसचे दरवाजे ऑटोमेटिक बंद होणार आहे. तसेच, धावत्या ट्रेनमध्ये दरवाजे उघडणार नाहीत, ज्यावेळी ट्रेन थांबेल, त्याचवेळी दरवाजे उघडतील.  

विवेक देबरॉय समितीच्या शिफारशीवरुन खासगीकरण2014 मध्ये अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याच्या शिफारशी केल्या होत्या. समितीच्या अहवालात काही विशिष्ट मार्गांवरील रेल्वेगाड्यांचे संचलन करण्यासाठी खासगी कंपन्यांना निमंत्रित करण्याच्या आणि स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प न मांडण्याच्या शिफारसींचाही समावेश होता.  

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेdelhiदिल्लीrailwayरेल्वे