शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 22:14 IST

आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह चौघांना ED ने चौकशीसाठी बोलावले आहे.

Delhi Liquor policy case : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर, आता ED ने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. याच प्रकरणात आता आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि पक्षाच्या इतर दोन नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्या सोबतच भंडारी समाजातील अशोक नाईक यांनाही एजन्सीने समन्स पाठवले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने 28 मार्च रोजी या सर्वांना चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात बोलावले आहे. ईडीचा आरोप आहे की, दिल्ली मद्य धोरणाच्या नावाखाली गोळा केलेला पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला होता. मात्र, आपचेगोवा प्रमुख अमित पालेकर यांनी एजन्सीचे हे आरोप फेटाळून लावत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली असल्याचे म्हटले आहे.

'कुठल्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार'एजन्सीने आपल्या आरोपपत्रात दावा केला की, AAP ने साउथ लॉबीकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांपैकी गोवा निवडणूक प्रचारात सुमारे 45 कोटी रुपये वापरले होते. दरम्यान, अमित पालेकर यांनी गोव्यात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपांचे खंडन केले. तसेच, पक्ष कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, ईडीने अमित पालेकर यांच्यासह रामराव वाघ आणि दत्तप्रसाद नाईक यांनाही समन्स बजावले आहे.

संबंधित बातमी- CM अरविंद केजरीवालांना उच्च न्यायालयाचा झटका, अटकेपासून दिलासा देण्यास नकार...

टॅग्स :AAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालgoaगोवा