शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल सरकारच्या अडचणी पुन्हा वाढणार? आणखी एका प्रकरणात CBI चौकशीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:17 IST

सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कारवाई केल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आणखी एका प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

नवी दिल्ली : दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर आता आणखी एका प्रकरणात केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 

सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कारवाई केल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आणखी एका प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

नायब राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये बनावट रुग्णांच्या नावाने बनावट पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्ट घेण्यात आल्या. या प्रकरणी नायब राज्यपाल यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे.

काय आहे प्रकरण?दरम्यान, ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 7 मोहल्ला क्लिनिकमध्ये काही अनियमितता आढळून आली होती. याठिकाणी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे कर्मचारी त्यांची उपस्थिती चुकीच्या पद्धतीने मार्क करत होते. सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि एफआयआर नोंदवण्यात आला. मोहल्ला क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी दिल्ली सरकारने दोन खासगी लॅबला कंत्राट दिले आहे. यामध्ये  M/s Agilus Diagnostics Ltd आणि  M/s Metropolis Health Care Ltd या लॅब आहेत.

जुलै ते सप्टेंबरपर्यंत किती टेस्ट?जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत लॅब रेकॉर्ड जमा करण्यात आले. यामध्ये या दोन्ही लॅबद्वारे केलेल्या टेस्ट रेकॉर्ड होत्या. या 7 मोहल्ला क्लिनिकमध्ये खोटे व चुकीचे मोबाईल क्रमांक टाकून रुग्णांची नोंदणी करून त्यांच्या लॅब टेस्ट करून घेण्यास सांगितले जात असल्याचे तपासणीत आढळून आले. एकापेक्षा जास्त रुग्णांसाठी अनेक मोबाईल क्रमांक वापरले गेले. जुलै ते सप्टेंबर 2023 दरम्यान 7 मोहल्ला क्लिनिकमध्ये 5,21,221 लॅब टेस्ट घेण्यात आल्या. एकूण 11,657 वेळा रुग्णाच्या मोबाईल नंबरवर फक्त '0' लिहिला गेला, तर 8251 प्रकरणांमध्ये रुग्णाचा नंबरच लिहिला गेला नाही.

निकृष्ट दर्जाच्या औषधांची सीबीआय चौकशी करण्याची शिफारसदरम्यान, दिल्लीतील घोटाळ्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा अलीकडेच नायब राज्यपालांनी दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमधील निकृष्ट दर्जाच्या औषधांची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे सापडल्याचा दावा दिल्लीच्या नायब राज्यपाल कार्यालयाने केला होता. कार्यालयाने सांगितले होते की, रुग्णालयात टेस्ट केलेल्या 10% नमुने फेल ठरले आहेत. त्यामुळे नायब राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दक्षता विभागाच्या अहवालाच्या आधारे नायब राज्यपालांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

दक्षता विभागाच्या रिपोर्टवर आधारित सीबीआय तपासदक्षता विभागाच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकारी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या 43 नमुन्यांपैकी 3 नमुने फेल झाले, कारण 12 रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. खाजगी प्रयोगशाळांना पाठवलेल्या इतर 43 नमुन्यांपैकी 5 नमुने फेल झाले असून 38 नमुने उच्च दर्जाचे आढळले आहेत. 10 टक्क्यांहून अधिक नमुने फेल झाल्याने विभागाने नमुने तपासणीची व्याप्ती वाढवावी, अशी शिफारस दक्षता विभागाने केली आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभाग