शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील वकिलांचे काम तिसऱ्या दिवशीही बंद; आत्मदहनाचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 06:59 IST

पक्षकारांना न्यायालयात येण्यापासून रोखले

नवी दिल्ली : तीस हजारी न्यायालयाच्या संकुलात वकील व पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीच्या निषेधार्थ राजधानीच्या सहा कनिष्ठ न्यायालयांतील वकिलांनी बुधवारीही कामकाजावर बहिष्कार घातला. पतियाळा हाऊस तसेच साकेत जिल्हा न्यायालयांची प्रवेशद्वारे बंद करून वकील पक्षकारांना न्यायालयात येण्यास मज्जाव करत होते.

रोहिणी जिल्हा न्यायालयात एका वकिलाने अंगावरील कपडे उतरवून अंगावर रॉकेल ओतून घेतले व आत्मदहनाचा इशारा दिला. दुसºया वकिलाने न्यायालयच्या इमारतीच्या गच्चीत जाऊन आपला निषेध व्यक्त केला. न्यायालयाच्या आवारामध्ये एकही पोलीस अधिकारी नसल्याने पक्षकारांची सुरक्षा तपासणी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पक्षकारांच्या बुरख्याआड समाजकंटकही न्यायालयात येण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्वच पक्षकारांना सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात येण्यापासून रोखले जात होते असे दिल्ली बार असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.

साकेत न्यायालयाबाहेर मोटरसायकलवरील एका पोलिसाला मारहाण करणाºया अज्ञात व्यक्तिंविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वकिलांनी केलेल्या मारहाणीविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या निदर्शनांची सविस्तर माहिती त्या शहराचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना आज दिली. वकील व पोलिसांमधील विश्वास कायम राखणे आवश्यक आहे असे बैजल यांनी मंगळवारी म्हटले होते. वकील व पोलिसांमधील धुमश्चक्रीमधील दोषी व्यक्तींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आॅल इंडिया असोसिएशन आॅफ आयआरएस (इन्कम टॅक्स) या संघटनेने केली आहे.मारहाणीची चौकशी करादिल्ली पोलिसांनी मंगळवारी केलेली निदर्शने हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ही निदर्शने राजकीय हेतूंनी प्रेरित असून त्याची निष्पक्षपाती चौकशी करावी अशी मागणी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे (बीसीआय) अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी बुधवारी केली आहे. पोलीस, वकील, जनता यांच्यासह कोणीही हिंसक प्रकार केले तर त्याची गय केली जाणार नाही असे बीसीआयने म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसCourtन्यायालय