शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Horror: त्या तरुणीवर अत्याचार झाला होता की नाही? मृत्यू कसा झाला, पोस्टमार्टेममधून धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:14 IST

Delhi Horror: कारसोबत फरफटत नेल्याने पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे छिन्नविछिन्न स्थितीमधील शरीर सापडले होते. या तरुणीवर अत्याचार झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या मृत तरुणीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये नववर्षाच्या सुरुवातीला एका तरुणीला अपघातानंतर कारमधील तरुणांनी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे छिन्नविछिन्न स्थितीमधील शरीर सापडले होते. या तरुणीवर अत्याचार झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या मृत तरुणीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार या तरुणीचं लैंगिक शोषण झालं नव्हतं. मात्र तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा सापडल्या. पण तिच्या गुप्तांगावर लैंगिक अत्याचारांना दुजोरा देतील, अशा कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. 

दिल्लीतील या २० वर्षीय तरुणीच्या स्कुटीला एका कारने धडक दिली होती. त्यानंतर या कारमधील तरुण तिला सुमारे १२ किमीपर्यंत फरफटत घेऊन गेले होते. त्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलियसांनी या प्रकरणात कारमधील पाच जणांना सोमवारी अटक केली होती. दरम्यान, भीषण अपघातामुळेच अंजलीला अनेक गंभीर जखमा झाल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे संकेत पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मिळत आहेत. अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याचे पोस्टमार्टेममधून समोर आले आहे.

मात्र पीडित तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी या कार अपघाताला मृत्यूचं कारण मानण्यास नकार दिला होता. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एका मेडिकल बोर्डाने सोमवारी तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्याचा रिपोर्ट आज पोलिसांना सोपवण्यात आला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र तिच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत, असे पोस्टमार्टेममध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून पीडितेचे जिन्स आणि स्वॅब सुरक्षित ठेवले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी