शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश कायम, काँग्रेसला पुन्हा धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 16:26 IST

हेराल्ड हाऊस प्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यामध्ये काँग्रेस आणि नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली - हेराल्ड हाऊस प्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यामध्ये काँग्रेस आणि नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने दिलेले स्पष्टीकरण फेटाळून लावत दिल्ली हायकोर्टाने हेराल्ड हाऊस रिकामे करण्याचा आपला जुना आदेश कायम ठेवला आहे. मात्र ही इमारत कधी रिकामी करायची याबाबत न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही.  मुख्य न्यायमूर्की राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही. के. राव यांच्या पीठाने 18 फेब्रुवारी रोजी केंद्र आणि एजेएल यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. दरम्यान, याआधी एजेएलकडून न्यायालयात हजर झालेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कंपनीचे बहुतांश समभाग यंग इंडियाकडे हस्तांतरीत झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी या हेराल्ड हाऊसच्या मालक होणार नाहीत असा दावा केला.  दरम्यान, ''केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, ज्याप्रकारे समभागांचे हस्तांतरण झाले आहे ते पाहता हेराल्ड हाऊसची मालकी नेमकी कुणाकडे आहे याची पडताळणी करण्यासाठी न्यायालयाने एजेएलवर पडलेल्या कॉर्पोरेड पडद्याच्या आता डोकावून पाहिले पाहिजे.'' याआधी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या सुनावणी वेळी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला 56 वर्ष जुने हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी दिल्ली हायकोर्टात नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडने(एजेएल) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते.  गेल्या 30 ऑक्टोबरला 'एलएनडीओ'ने नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडला(एजेएल) नोटीस पाठवून 15 नोव्हेंबरपर्यंत हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात असोसिएट जर्नल्स लिमिटेडने गेल्या 12 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावेळी दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवरील निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर याप्रकरणी आज सुनावणी झाली.   

टॅग्स :Courtन्यायालयcongressकाँग्रेस