शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचं खरं वचन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार नाही, हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 12:54 IST

एका बलात्कार प्रकरणीशी निगडीत खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली-

एका बलात्कार प्रकरणीशी निगडीत खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. एक पुरूष आणि स्त्री दीर्घकाळ संबंधात होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणाने नाते तुटले आणि लग्न होऊ शकले नाही. 

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी कलम ३७६(२)(एन) अन्वये एखाद्या पुरुषाला लग्नाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला. कोर्टाने सांगितले की, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने मुलीच्या आई-वडिलांना तीन महिने लग्नाला परवानगी देण्यासाठी राजी केले होते. दरम्यान, दोघांमधील शारीरिक संबंधात महिलेची संमती गैरसमज किंवा भीतीवर आधारित नव्हती. 

दोघांचा साखरपुडा झालेलादोघांचा साखरपुडा झालेला होता असेही कोर्टाने यावेळी नमूद केले. त्यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. यावरून असे दिसून येते की, याचिकाकर्त्याचा आरोपीशी लग्न करण्याचा हेतू खरा होता. केवळ संबंध तुटल्यामुळे याचिकाकर्त्याचा आरोपीशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा दावा करता येणार नाही. फिर्यादीने शारीरिक संबंधांना दिलेली संमती चुकीच्या विश्वासावर किंवा भीतीवर आधारित नव्हती, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे. 

आपल्यावरील आरोप खोटे असून संबंधित महिलेवर प्रेम होते, असे आरोपीने न्यायालयाला सांगितले. शिवाय तिच्यासोबत सेटल होण्याचाही इरादा होता पण हे नाते वाईट अटींवर संपुष्टात आले. न्यायालयाने आरोपीच्या बाजूने गुणवत्तेचे निरीक्षण केले आणि स्पष्ट केले की 'लग्नाचे खोटे वचन' आणि 'लग्न करण्याच्या वचनाचा भंग' यात फरक आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी