शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:20 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विनंतीवरून सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना वकिलांसोबत एक्स्ट्रा मिटिंगसंदर्भात तिहार तुरुंग आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. अरविंद केजरीवाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्यावर ३० खटले सुरू आहेत, त्यासाठी त्यांना वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी एक्स्ट्रा मिटिंगसाठी परवानगी द्यावी. सध्या त्यांना आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटण्याची परवानगी आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने तिहार तुरुंग प्राधिकरण आणि ईडीला नोटीस बजावली असून त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. सध्या नियमानुसार, अरविंद केजरीवाल त्यांच्या वकिलांना आठवड्यातून दोनदाच भेटू शकतात. अरविंज केजरीवाल यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर ३० हून अधिक खटले आहेत, त्यामुळे त्या खटल्यांवर अधिक चर्चा करण्यासाठी वकिलांसोबतच्या मिटिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत.  २१ मार्च रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आणि १० मे रोजी त्यांना अंतरिम जामीन मिळाला होता. २ जून रोजी त्यांनी पुन्हा तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर २० जून रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला, मात्र दुसऱ्याच दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीनाला स्थगिती दिली. यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात चौकशी केल्यानंतर २६ जून रोजी त्यांना अटक केली.

टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय