शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:24 IST

Smriti Irani Defamation Case:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली.

Smriti Irani Defamation Case:  स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर दिल्ली उच्च न्यायालयानेकाँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले आहे. या नेत्यांनी आपल्या मुलीवर लावलेल्या आरोपांमुळे स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या टिप्पण्या २४ तासांत काढून टाकण्यास सांगितले. उच्च न्यायालय पुढे म्हणालं, त्यांनी कमेंट हटवली नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या कमेंट्स काढून टाकावा, स्मृती इराणींनी मानहानीचा आरोप करत 20 कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

तथ्य न तपासता आरोप- हायकोर्टया प्रकरणी न्या.  मिनी पुष्करणा म्हणाले, 'मला प्रथमदर्शनी असे वाटते की (स्मृती आणि त्यांच्या मुलीवर) हे आरोप तथ्यांची पडताळणी न करता करण्यात आले आहेत. यामुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पत्रकार परिषदेत केलेले आरोप काढून टाकण्याचे निर्देश न्यायालय देत आहे. 

२४ तासांच्या आत ट्विट हटवायचेन्यायालयाने म्हटले आहे की, जर प्रतिवादींनी 24 तासांच्या आत त्याच्या निर्देशांचे पालन केले नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबने स्वतः संबंधित सामग्री काढून टाकावी. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली. 

असे काँग्रेस नेते म्हणालेन्यायालयाचे समन्स जारी केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम नरेश म्हणाले की, ते आणि या प्रकरणात गुंतलेले इतर काँग्रेस नेते सर्व तथ्य न्यायालयासमोर ठेवतील आणि केंद्रीय मंत्र्यांचे हे प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न हाणून पाडतील. त्यांनी ट्विट केले की, 'दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर औपचारिकपणे उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडण्यास आम्ही उत्सुक आहोत. स्मृती इराणी ज्या पद्धतीने हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही आव्हान देऊ आणि हाणून पाडू.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेसdelhiदिल्ली